1066
29-Dengue-Fever-E-Aprvd.png

डेंग्यूचा ताप – हे माहीत असावे

हैद्राबादमध्ये पहिल्या पावसाच्या सरी पडल्या आणि शहरात डेंग्यूच्या तापाची प्रकरणे वाढली. हैद्राबाद, रंगा रेड्डी आणि मेडचल जिल्ह्यांमध्ये अनेक संशयास्पद प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. यावर्षी आत्तापर्यंत संपूर्ण तेलंगणा राज्यामध्ये नोंदवल्या गेलेल्या प्रकरणांची संख्या एव्हाना ९०० वर पोहोचली आहे. डेंग्यूचा सामना करण्यासाठी आणि त्याला दूर ठेवण्यासाठी आपण त्याबाबत सर्वकाही जाणून घेतले पाहिजे.

डेंग्यूचा ताप म्हणजे काय?

डेंग्यूचा ताप हा विषाणूजन्य संक्रमणाचा आजार आहे जो एडीस नावाच्या डासामुळे होतो. चार संबंधित डेंग्यू विषाणूंपैकी कशामुळेही हा आजार होऊ शकतो. डेंग्यूच्या तापाला हाडे मोडणारा तापही म्हणतात कारण त्यामुळे कधीकधी स्नायू आणि सांधे प्रचंड दुखतात आणि अगदी हाडे मोडल्यासारखे वाटते. जगभरामध्ये अनेक देशांमध्ये हा आजार आढळतो आणि दक्षिण पूर्व आशिया, चीन, भारत, दक्षिण आणि मध्य अमेरिका आणि आफ्रिकेमध्ये हा विशेषतः सामान्य आहे.

कारण

डेंग्यूचा ताप डेन-१, डेन-२, डेन-३ आणि डेन-४ या डेंग्यू विषाणूंपैकी कोणत्याही एकामुळे होतो. रुग्णाला संपूर्ण आयुष्यात अगदी चारही प्रकारच्या नाही तरी निदान दोन प्रकारच्या विषाणूंचा संसर्ग होऊ शकतो, परंतु एका प्रकारच्या विषाणूचा केवळ एकदाच संसर्ग होतो.

लागण

संसर्ग झालेला एडीस डास चावल्यामुळे डेंग्यूच्या विषाणूची लागण होते. एडीस डास जेव्हा डेंग्यूचा संसर्ग झालेल्या व्यक्तींना चावतो तेव्हा त्याला संसर्ग होतो आणि मग हाच डास इतर लोकांना चावला की त्यांनाही संसर्ग होतो. डास मध्यस्थ असल्याशिवाय डेंग्यूच्या तापाची एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला लागण होत नाही.

डेंग्यूची लक्षणे

वयानुसार अचूक लक्षणे दिसतात आणि संसर्ग झालेला डास चावल्यानंतर साधारण ४-७ दिवसांमध्ये लक्षणे दिसू लागतात. पहिल्या दर्जाच्या डेंग्यूची सर्वात सामान्य लक्षणे म्हणजे –

  • १०५ अंश फॅरानाईटपर्यंत खूप जास्त ताप येणे
  • स्नायू आणि सांध्यांमध्ये खूप वेदना होणे
  • तीव्र डोकेदुखी
  • छाती, पाठ किंवा पोटावर पुरळ यायला सुरुवात होऊन ते हातापायावर आणि चेहऱ्यावर पसरते
  • डोळ्यांत वेदना
  • मळमळणे आणि उलट्या होणे
  • अतिसार

तथापि, आजार सौम्यही असू शकतो की ज्यामध्ये लक्षणे दिसतच नाहीत.

लहान मुलांना डेंग्यू झाल्यास अनेकदा पुरळ येते, परंतु इतर लक्षणे किरकोळ असतात. ही लक्षणे डेंग्यूच्या तापा व्यतिरिक्त इतर समस्यांमुळे असू शकतात. अलीकडेच डेंग्यूच्या तापाचा संसर्ग झालेल्या ठिकाणी तुम्ही प्रवास केला असेल आणि यांपैकी काही लक्षणे दिसत असतील तर, त्वरित तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

डेंग्यूचा ताप कधीकधी वाढून संभाव्यतः जीवघेणा आजार ठरू शकतो. डेंग्यूच्या रक्तस्रावाच्या तापामध्ये पहिल्या दर्जाच्या डेंग्यूची लक्षणे तर दिसतातच, शिवाय नाक, हिरड्यांतून रक्त येते किंवा त्वचेखाली रक्तस्राव होतो आणि काळ्यानिळ्या खुणा उमटतात. अशा प्रकारच्या डेंग्यूच्या आजारामुळे मृत्यू होतो.

डेंग्यूला प्रतिबंध कसा करता येतो?

डेंग्यूच्या विषाणूचे संक्रमण टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे डास चावणे टाळणे. शरीर शक्य तितके झाकणारे, हलक्या रंगाचे, सैल, संरक्षक कपडे घालावे.

एडीस डास दिवसा चावतो. तेव्हा, तुम्ही पहाटे आणि संध्याकाळी अंधार पडण्यापूर्वी जास्त सावधानी बाळगावी. इतर सावधानींमध्ये समावेश होतो:

  • कीटक निरोधक वापरा – डीट नावाचे रसायन असलेली निरोधके जास्त प्रभावी असतात
  • आसपास पाणी साठू देऊ नये.
  • लांब बाह्यांचे आणि फिकट कपडे घालावे
  • खिडक्यांना जाळ्या नसतील तर डास येऊ नयेत म्हणून त्या बंद ठेवाव्या
  • डास अंडी घालू शकतील असे पाणी साठले असल्यास ते काढून टाकावे, जसे की फुलदाण्या, पिंप, भांडी इत्यादी.

Could not find the what you are looking for? 

Request a Callback

Image
Image